पुण्यातल्या आझम कॅम्पसमध्ये आज हिजाबच्या समर्थनार्थ कुल जमाती तांजिम पुणे यांच्याकडून महासभा बोलवण्यात आली. हिजाबच्या नावाखाली जो भेदभाव करण्यात येतोय त्याला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या असे आवाहन करण्यात आले होते... त्यामुळे आझम कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुणी जमल्या होत्या. इथे कायदा-सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.